Home Accident News अहमदनगर: कार आणि दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू

अहमदनगर: कार आणि दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: कर्जत- करमाळा रस्त्यावर कोरेगाव शिवारात कार आणि दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू.

Two killed in a car and two-wheeler accident

कर्जत : कर्जत तालुक्यातील कर्जत- करमाळा रस्त्यावर कोरेगाव शिवारात कार आणि दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २६) दुपारी घडली. मृतांमध्ये दुचाकीवरील दोघांचा समावेश आहे.

तुषार पांडुरंग बेद्रे (वय ३२), शिवम सचिन चांदगुडे (वय १९, दोघे रा. देवीचा माळ, करमाळा, जि. सोलापूर) अशी मयतांची नावे आहेत.

बुधवारी दुपारी कर्जत-करमाळा रस्त्यावर कोरेगाव शिवारात कार (क्र. एमएच १२ – एलजे ३५२७) व दुचाकी (क्र. एमएच १२ – जेएक्स २६३८) यांचा अपघात झाला. यात दुचाकीवरील तुषार पांडुरंग बेद्रे, शिवम सचिन चांदगुडे यांचा मृत्यू झाला. कार चालक वाहन तेथेच सोडून पळून गेल्याचे समजते. दुचाकीवरील दोन्ही युवक नातेवाइकांचे लग्न उरकून करमाळ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही युवकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

कर्जत पोलिस ठाण्यात निखिल तात्या धांडे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे करीत आहेत.

Web Title: Two killed in a car and two-wheeler accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here