Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मोटारसायकल घसरली अन कार अंगावरून गेल्याने दोघांचा मृत्यू

अहिल्यानगर: मोटारसायकल घसरली अन कार अंगावरून गेल्याने दोघांचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: मोटारसायकवरुन कार गेल्याने मोटरसायकलवरील दोघे चिरडून मृत्यूमुखी.

Two killed after motorcycle skids and is run over by car

नेवासा | पाचेगाव फाटा:  मोटारसायकल घसरुन रस्त्यावर पडली. या मोटारसायकवरुन कार गेल्याने मोटरसायकलवरील दोघे चिरडून मृत्यूमुखी पडले तर दूरवर फेकला गेलेला एकजण जखमी झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील पुनतगाव फाट्याजवळ घडली. मृत पावलेले दोघेही पुनतगाव येथील रहिवासी होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार 5 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ईसम नामे विक्रम भीमा आढाव (रा. शिरजगाव ता. येवला जि. नाशिक) हे आपल्या दोन मित्रांसमवेत मित्राच्या मारुती रिट्स कारने भालगाव तालुका नेवासा येथे स्वतःकरिता सेकंडहॅण्ड कार पाहण्यासाठी श्रीरामपूरकडून नेवाशाकडे येत होते. पुनतगाव फाट्याच्या जवळ नेवाशाकडून एका मोटारसायकलवर तिघेजण येत असताना मोटारसायकल घसरून पडल्याने ती कारखाली आली.

Breaking News: Two killed after motorcycle skids and is run over by car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here