अहमदनगर: दोन मालट्रकची समोरासमोर धडक होवून एकाचा जागीच मृत्यू
Breaking News | Ahmednagar: २ मालट्रकची समोरासमोर धडक होवून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना, बायपास रस्त्यावर गेल्या ६ दिवसांतील हा तिसरा अपघात. चौघांचा बळी.
अहमदनगर: नगर शहराच्या बाहेरील बायपास रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून निंबळक शिवारात पुलावर रात्रीच्या वेळी २ मालट्रकची समोरासमोर धडक होवून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२६) पहाटे ३ च्या सुमारास घडली.
हिरा राम (वय १९, रा. बाड्नेर, राजस्थान) असे या अपघातातील मयताचे नाव आहे. बायपास रस्त्यावर निंबळक शिवारात पुलावर २ मालट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यातील एका ट्रकमध्ये क्लिनर असलेला हिरा राम हा जागीच ठार झाला. तर दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना. संदीप पितळे हे करत आहेत.
बायपास रस्त्यावर गेल्या ६ दिवसांतील हा तिसरा अपघात आहे. मागील शनिवारी (दि.२२) सकाळी ७.३० च्या सुमारास अरणगाव ते वाळूज बायपास रस्त्यावर मालट्रक व कंटेनरची समोरासमोर धडक होवून दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी (दि.२४) पहाटे २.३० च्या सुमारास नेप्ती कांदा मार्केट च्या पुढे नेप्ती शिवारात रस्त्यावरच उभ्या करण्यात आलेल्या कंटेनरवर भरधाव वेगातील आयशर टेम्पो धडकून टेम्पो चालक जागीच ठार झाला होता. तर बुधवारी (दि.२६) पहाटे निंबळक शिवारात पुलावर २ मालट्रकची समोरासमोर धडक झाली. या ३ अपघातात चौघांचा बळी गेला आहे.
Web Title: Two goods trucks collided head-on, one died on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study