अहमदनगर: दोन मुली बेपत्ता, मुलीना आमिष दाखवून पळवून नेले
Breaking News | Ahmednagar: शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मुली बेपत्ता.
श्रीरामपूर : शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी कुटुंबीयांकडून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील भोकर येथे १७ वर्षीय मुलगी रात्री आई व बहिणीसमवेत झोपलेली होती. मात्र, मध्यरात्री ती बेपत्ता झाली. आई व बहिणीने तिचा परिसरात शोध घेतला. घटनेची माहिती बाहेरगावी असणाऱ्या वडिलांना देण्यात आली. नातेवाइकांकडे मुलीबाबत माहिती घेण्यात आली. मात्र, ती मिळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दुसरी घटना बेलापूर येथे घडली असून, तेथे १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. रात्रीच्या वेळी सर्वजण झोपलेले असताना ही घटना घडली. कुटुंबीयांनी मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस मुलींचा शोध घेत आहेत.
Web Title: Two girls missing, girls lured and kidnapped
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study