Sangamner Crime: संगमनेरातील दोघे हद्दपार
Sangamner Crime: संगमनेरातील दोघे हद्दपार, एका वर्षाकरिता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
संगमनेर : संगमनेर शहरातील दोघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. नवाज जावेद कुरेशी आणि अब्दुल वाहीद अब्दुल करीम कुरेशी (दोघेही रा. भारतनगर, ता. संगमनेर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघांनी नावे आहेत. त्यांना एका वर्षाकरिता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, नवाज कुरेशी आणि अब्दुल कुरेशी हे दोघे गोवंश जनावरे आणून त्यांची हत्या करून मांस विक्री करणे, गोवंश मांस वाहतूक करायचे. त्यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्यान्वये वेगवेगळ्या कलमांखाली विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगार हे सराईत असल्याने त्यांना जिल्ह्यातून एका वर्षाकरिता हद्दपार करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मदने यांनी सांगितले.
गोमांस तस्करीच्या गुन्ह्यांतील आरोपींची हद्दपारी करावी. गेल्या दहा वर्षांत शहर पोलीस ठाण्यातील गोवंश कत्तलीसंदर्भात दाखल गुन्ह्यांच्या तपासी अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची चौकशी व्हावी, यासह विविध मागण्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी संगमनेर प्रांत कचेरीसमोर आंदोलनही करण्यात आले होते. यात हिंदुत्ववादी संघटनांसह काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील सहभागी झाले होते.
Web Title: Two from Sangamner deported