शेतकऱ्याकडून लाच घेताना महावितरणचे दोन कर्मचारी जाळ्यात
Breaking News | Bribe News: शेतातील जळालेले विद्युत रोहित्र दुरुस्त करून पुन्हा बसविण्याकरिता विद्युतपुरवठा काही काळासाठी खंडित करण्यासाठी दीड हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या बेलवंडी उपविभागाच्या २ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ.
नगर: शेतातील जळालेले विद्युत रोहित्र दुरुस्त करून पुन्हा बसविण्याकरिता विद्युतपुरवठा काही काळासाठी खंडित करण्यासाठी दीड हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या बेलवंडी उपविभागाच्या २ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
प्रधान तंत्रज्ञ सुनील मारुती शेळके (वय ४५, रा. थोरात वस्ती, वाडेगव्हाण, ता. पारनेर) व बाह्यस्रोत तंत्रज्ञ वैभव लहु वाळके (वय २२, रा. बेलवंडी) अशी दोघांची नावे आहेत. विद्युतपुरवठा खंडित करण्यासाठी वाळके याने शेळके याच्याकरिता व स्वतः करिता दीड हजार रुपये लाच मागितली. शुक्रवारी पडताळणी होऊन त्याच दिवशी वैभव वाळके याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच, सुनील शेळके यालाही ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Two employees of Mahavitaran caught in the net while taking bribe from the farmer
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study