Home अहमदनगर नगरमध्ये दोन धनगर आंदोलक अचानक बेपत्ता, गोदावरीच्या काठावर चिठ्ठी सापडली

नगरमध्ये दोन धनगर आंदोलक अचानक बेपत्ता, गोदावरीच्या काठावर चिठ्ठी सापडली

Breaking News | Ahmednagar: उपोषणामधून दोन आंदोलक अचनक बेपता झाले, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

Two Dhangar protesters suddenly go missing in town, note found on banks of Godavari

अहमदनगर : सध्या राज्यभरात धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे गेल्या 9 दिवसांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. मात्र सरकार या आंदोलनाची दाखल घेत नसल्याने जलसमाधीचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. त्यातच आता दोन आंदोलक उपोषणस्थळावरून बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे गेल्या 9 दिवसांपासून धनगर समाजाचे उपोषण सुरु आहे. आज या उपोषणामधून दोन आंदोलक अचनक बेपता झाले आहेत. या आंदोलकांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

यानंतर आता दोन आंदोलक बेपत्ता झाले आहेत. प्रल्हाद सोरमारे आणी बाळासाहेब कोळसे असे या आंदोलकांची नावे आहेत. आम्ही जलसमाधी घेत आहोत. यास सर्वस्वी सरकार जबाबदार अशा मजकुराची चिठ्ठी जिल्ह्यातील प्रवरासंगम येथील गोदावरी नदीकाठी आढळून आली आहे.

सध्या दोघांचे फोन देखील नॉटरीचेबल असून गोदावरी नदीकाठच्या पुलावर चपला आढळल्या आहेत. यामुळे दोघांनी नदीत उडी घेतल्याची शंका व्यक्त होत आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. या घटनेने आंदोलकांमध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस बेपत्ता झालेल्या आंदोलकांचा शोध सुरु आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Two Dhangar protesters suddenly go missing in town, note found on banks of Godavari

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here