Home संगमनेर संगमनेरातील दोन भाविकांचा दर्शनासाठी जात असताना अपघातात मृत्यू

संगमनेरातील दोन भाविकांचा दर्शनासाठी जात असताना अपघातात मृत्यू

Breaking News | Sangamner Accident: उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यु.

Two devotees died in an accident while going for darshan

संगमनेर:  ऐन पाडव्याचा दिवशी बाबीर बाबाच्या दर्शनास जात असलेल्या आश्वी बुद्रुक (तालुका संगमनेर) येथील दोन भाविकांचा अपघाती मृत्यू झाल्याने आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य जाखोबा राणुजी पिलगर व प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव मुरलीधर खेमनर यांचा या अपघातात मृत्यू झाला.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री. क्षेत्र बाबीर बाबा देवस्थान येथे दर्शनासाठी शनिवारी ( दि. २ नोव्हेंबर) मोटरसायकल वर जात होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर -मनमाड रोडवर शिंगवे नाईक शिवारात समोरुन येत असलेल्या कंटेनरने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच दरवर्षी बाबीर देवस्थान दर्शनाला जाणाऱ्या भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिंगवे गावातील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यु झाला. जाखोबा पिलगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी, जावई, सुन , नातवंड असा मोठा परिवार आहे. विठ्ठलराव खेमनर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, दोन मुली सुना, नातु , जावई असा मोठा परिवार आहे. ऐन सणासुदीत या घटनेने आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Two devotees died in an accident while going for darshan

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here