अहमदनगरसह १८ जिल्ह्यांना दोन दिवस अलर्ट , विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Ahmednagar Rain Alert: 18 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, मुसळधार पावसाची शक्यता.
पुणे: हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 18 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यभरात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, त्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने काही भागांत विश्रांती घेतली. राज्यभरात मागील आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, त्यानंतर दोन दिवसांपासून पावसाने काही भागांत विश्रांती घेतली. त्यानंतर आता पुन्हा राज्यभरात मुसळधार ते अतिमुसळदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Web Title: Two days alert for 18 districts including Ahmednagar, the possibility of heavy rain alert