अकोलेत: बिबट्याच्या तावडीतून दोघा मुलांनी केली आईची सुटका
Breaking News | Akole: भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला व मायलेकावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना.
अकोले: तालुक्यातील देवठाण गावातील काळे वस्तीवर भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला व मायलेकावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. परंतु, दोन्ही मुलांच्या धाडसामुळे आई बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
अकोले तालुक्यातील देवठाण शिवारातील काळेवाडी भागात उसाच्या शेतातून भक्ष्याच्या शोधात मांजराचा पाठलाग करत बिबट्या थेट एका घरात घुसला. घरातील महिला व तिच्या मुलास जखमी केले. त्यांच्यावर अकोले येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास काळेवाडीत मांजराचा पाठलाग करताना बिबट्या रामहारी काळे यांच्या घरात घुसला. घरात बरेच जण झोपलेले
होते. त्यात किसनाचाई रामहारी काळे (वय ५८) यांना जखमी केले. त्यांच्या डोक्याला दोन बाजूंना मोठी जखम असून, नाकाजवळ बिबटचाच्या पंजाने जखम झाली आहे. त्यांचा मुलगा वैभव रामहारी काळे (वय ३१) यास हाताला व पाठीला पंजा ओरखडल्याची जखम झाली आहे. जखमींना वनविभागाच्या मदतीने नाशिक येथे हलविण्यात आले. त्यानंतर काळे मायलेक यांनी पुन्हा अकोलेत येण्याचा निर्णय घेतला, किसनाबाई यांना अकोलेतील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, वैभव यांच्यावर उपचार करून घरी पाठविले.
बिबट्या रात्री घरात घुसला. बिबट्याने हल्ला करून आईचे डोके आपल्या पंजात पकडले. मी व माझ्या भावाने बिबट्यास दाबून धरत आईची सुटका करून घेतली. बिबट्या निसटला व घराच्या दुसऱ्या भागात गेला. तेथे तो एक-दीड तास बसला. आम्ही घराचे दार उघडून दिलेले होते. नंतर बिबट्याने धूम ठोकली.
महिलेस डोक्याला दोन ठिकाणी मोठी जखम झाली आहे. तरुणाच्या हाताला किरकोळ जखम आहे. उपचारासाठी नाशिक येथे नेले होते. मात्र त्यांची सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याची मानसिकता-नसल्याने पुन्हा अकोले येथे आम्मूम खासगी रुग्णालयात दाखल केले. वनविभागाकडून सर्व सहकार्य केले जात आहे.
Breaking News: Two children rescue mother from bibatya attack