दोघा भावांनी दारू पिऊन पोलीस ठाण्यातच घातला धिंगाणा
राहुरी | Rahuri: राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात 11 ऑगस्ट रोजी दोघा चुलत भावांनी दारू पिऊन आरडाओरडा करत धिंगाणा घातल्याचा प्रकार केल्याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी दारूबंदी कायदा कलम नुसार कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
11 ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन महाभाग दारूच्या नशेत राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात घुसून मोठ मोठ्याने आरडाओरडा करत पोलीस ठाणे डोक्यावर घेतले.
आमची फिर्याद घ्या नाहीतर आम्ही दोघे विषारी औषध घेऊ अशी दमबाजी करू लागले. ठाणे अमलदाराने विचारले असता कोणाविरुद्ध फिर्याद द्यायची आहे. यावेळी दोघांनी दारूच्या नशेत माहित नाही असे म्हणत पोलीस ठाणे डोक्यावर घेत आरडाओरडा सुरूच ठेवली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांना थोडाफार मार देत. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीला नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला घेत पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीवरून तुकाराम रामकृष्ण राजदेव वय 35 वर्षे व संदिप नामदेव राजदेव वय 30 वर्षे दोघे रा. ब्राम्हणी, ता. राहुरी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास हवालदार दिनकर चव्हाण हे करीत आहेत.
Web Title: Two brothers got drunk and rushed to the rahuri police station