Home संगमनेर संगमनेर: रस्ता लुट करणार्‍या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

संगमनेर: रस्ता लुट करणार्‍या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Sangamner News: रिक्षाला अडवून मारहाण करीत रस्ता लुट करणार्‍या दोघा आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर शिवारातून ताब्यात घेतले (Arrested).

two accused who robbed the road widened

संगमनेर:  नाशिक-पुणे महामार्गावर कर्जुलेपठार शिवारात रिक्षाला अडवून मारहाण करीत रस्ता लुट करणार्‍या दोघा आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर शिवारातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संजय सुदाम मोरे (वय 23, रा. रामवाडी, सवंत्सर, ता. कोपरगाव), आशिष उर्फ काल्या राममिलन कोहरी (रा. पुणतांबा चौफुली, कोकमठाण, ता. कोपरगाव) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावर कर्जुलेपठार शिवारातून राजकुमार श्रीरंग भालके (रा. माळवाडी, पुणे) हे त्यांच्या साथीदारासोबत रिक्षाने जात असताना इर्टिका कारमधून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी त्यांची रिक्षा अडवून कोयत्याने रिक्षाची काच फोडली. तर राजकुमार भालके यांना जबर मारहाण केली व त्यांच्याकडील 1 लाख 35 हजार रुपयांची रोकड लांबवली. याबाबत भालके यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार आहेर यांनी पोलीस पथक तपासाच्या दृष्टीने रवाना केले. पथकाने नाशिक-पुणे महामार्गालगत असलेले हॉटेल, धाबे, टोलनाके यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करत आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कोपरगावकडे रवाना झाले. सवंत्सरमधील रामवाडी येथून संजय सुदाम मोरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

आशिष उर्फ काल्या राममिलन कोहरी (रा. पुणतांबा चौफुली) आणि करण सुदाम मोरे (रा. रामवाडी, सवंत्सर) व करण मोरे याचे दोन साथीदार यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टिका गाडी क्रमांक एम. एच. 06 बी. एम. 2339 तसेच रोख रक्कम असा एकूण 5 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजय मोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिक, येवला पोलीस ठाण्यात विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय वेठेकर, अतुल लोटके, रविंद्र कर्डिले, संतोष खैरे, फुरकान शेख, रणजीत जाधव, रोहित येमुल, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव यांनी सहभाग घेतला.

Web Title: two accused who robbed the road widened

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here