राजूर घाटातील बलात्कार प्रकरणात ट्विस्ट, महिला म्हणते, माझ्यासोबत…
Gang Rape Case: राजूर घाटात एका 34 वर्षीय महिलेवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
बुलढाणा: बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात एका 34 वर्षीय महिलेवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी 8 आरोपींविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेसोबत असलेल्या दिराच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या दिराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र माझ्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे त्या महिलेचं म्हणणं आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनमधे जाऊन पोलिसांनी तात्काळ बलात्काराचे गुन्हे दाखल करावे, आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणी केली होती.
याप्रकरणी महिलेच्यासोबत असलेल्या दिराचं म्हणणं आहे की तिच्यावर अत्याचार केला गेला. मात्र माझ्यावर अत्याचार झालाच नसल्याचं स्पष्टीकरण महिलेने दिलंय. त्यामुळे दोघांच्या वेगवेगळ्या जबाबामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिस आपल्या पद्धतीने तपास करत आहेत आणि लवकरच सत्य समोर येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी होणार का हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण जर बलात्कार झालाच नाही तर सोबतच्या पुरुषाने बलात्काराची तक्रार का दिली? आणि पोलिसांनी महिलेला न विचारता थेट गुन्हा दाखल कसा काय आणि कुणाच्या दबावाखाली केला….? याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. नेमकी काय प्रकरण आहे हे तपासाअंती समोर येणार आहे.
महिलेचा जबाब:
आपल्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नसून आम्ही दुपारी दोन वाजता देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून टेकडीवर बसलो. त्यानंतर तिथे काही तोंडाला रुमाल बांधलेले टवाळखोर आले त्यांनी माझ्या सोबतच्या पुरुषाला मारहाण करत पैसे आणि मोबाईल हिसकला आणि त्यांच्या मोबाईल मधे आमचे फोटो काढले आणि निघून गेले असा जबाब महिलेने पोलिसांना दिला. याशिवाय अत्याचार झालेलाच नसल्याने माझ्या वैद्यकीय तपासणीचीही गरज नाही. असेही या महिलेने म्हटलंय.
Web Title: Twist in Rajur Ghat rape case
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App