शाळकरी मुलीवरील अत्याचार शिक्षकास वीस वर्षे सश्रम कारावास
Breaking News | Ahmednagar: जेवणाच्या सुटीत मुलीला कार्यालयात बोलावून तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार.
श्रीगोंदा : एका नऊ वर्षाच्या शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरणी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथील एका प्राथमिक शिक्षकास श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी २० वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना नोव्हेंबर २०१५ मध्ये घडली होती. राजेंद्र अरुण साळवे असे या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. याबाबतची हकीगत अशी, श्रीगोंदा तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पीडित मुलगी इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होती. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी मुलीच्या आजोबांनी तिला शाळेत सोडले होते. वर्गशिक्षक राजू अरुण साळवे याने दुपारी जेवणाच्या सुटीत मुलीला कार्यालयात बोलावून घेतले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलीने शाळा सुटून घरी चार साक्षीदार महत्त्वाचे… घटनेचा तपास करून पोलिस शिपाई मनतोडे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.
खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता, पीडितेची चुलती, जिल्हा परिषद शिक्षक, डॉक्टर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या, सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे / गायके यांनी न्यायालयासमोर कामकाज पाहिले. आल्यानंतर चुलतीस सांगितला. तसेच यापूर्वीही शिक्षकाने तीन ते चार वेळा असा प्रकार केल्याचे मुलीने चुलतीस सांगितले. ‘मला या शाळेत जायचे नाही’, असे तिने सांगितले. त्यानंतर तिचे आजोबा व चुलती यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. यावरून राजेंद्र अरुण साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून व आलेला साक्षी पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम ३७६ (२), एफ.एन. अन्वये १० वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद, तसेच बाललैंगिक अत्याचार कायदा कलम ५ एम अन्वये २० वर्षे सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद, तसेच भा.दं.वि. कलम ३५४ अन्वये ६ महिने साधी कैद व ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. वरील शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. सरकारी वकिलांना डी.एन. शिरसाठ व आशा खामकर यांनी सहकार्य केले.
Web Title: Twenty years rigorous imprisonment for the teacher who raped
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study