Breaking News | Ahmednagar: ट्रकला करंजी घाटात शनिवारी पहाटे अचानक आग लागल्याने या आगीमध्ये ट्रकच्या केबिनचा भाग पूर्णपणे जळून खाक.
पाथर्डी: उसाचा भुसा घेऊन करंजी घाट मार्गे नगरकडे जात असलेल्या ट्रकला करंजी घाटात शनिवारी पहाटे अचानक आग लागल्याने या आगीमध्ये ट्रकच्या केबिनचा भाग पूर्णपणे जळून खाक झाला. तर पोलीस यंत्रणा वेळेत घटनास्थळी दाखल झाल्याने जीवित हानी टळली व उसाचा भुसा देखील सुरक्षित राहिला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी कडून मांडगाव तालुका दौंडकडे उसाचा भुसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला शनिवारी पहाटे करंजी घाटात अचानक चालकाच्या केबिन जवळ आग लागली. चालक शेखर अहिरे यांनी प्रसंगावधान राखून गाडीतून बाहेर उडी मारली. करंजी घाटात ट्रकला आग लागल्याची माहिती करंजी पोलीस चौकीला समाजताच पोलीस हेडकॉन्स्टेबल गरगडे, टकले, पालवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्रकमधील उसाचा भुसा व ट्रकचा बराचसा भाग सुरक्षित राहिला. आग केबिनच्या बाजूने लागल्यामुळे ट्रकच्या केबिनचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Web Title: Truck on fire in Ghat
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study