समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची मागून धडक; तिघांचा जागीच मृत्यू, अपघातांची मालिका सुरूच
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला.
वर्धा: समृद्धी महामार्गावर अनेक भीषण अपघात झाले आहे. त्यामुळे या अपघातांची मालिका कधी थांबणार असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री साडे बारा वाजता दरम्यान घडला.
डॉक्टर ज्योती क्षीरसागर, डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे, भरत क्षीरसागर अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केली.
समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जातं असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला. ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून मैत्रीण आहे.
नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जातं असताना ज्योती क्षीरसागर हिचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
जाम महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थ गाठत वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
Web Title: Truck hits car from behind on Samriddhi Highway Accident Three died on the spot
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App