अहिल्यानगर: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला, ट्रक चालक ठार
Ahilyanagar Accident: घाटात चालकाचा ट्रक ताबा सुटल्याने ट्रक थेट दरीत कोसळल्याने अपघात , ट्रक चालक ठार
पाथर्डी: तालुक्यातील माणिकदौंडी घाटात चालकाचा ट्रक ताबा सुटल्याने ट्रक थेट दरीत कोसळल्याने अपघात झाला. यात ट्रक चालक ठार झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. यात प्रवीण आजिनाथ मेंगुळे (वय 39 रा. पिंपळगाव ता. जामखेड जि.अहिल्यानगर) असे अपघातात मृत झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशी की, बारामतीवरून छत्रपती संभाजीनगरकडे पुठ्ठ्याने भरलेला ट्रक माणिकदौंड घाट उतरत असतांना धोकादायक वळणावर ताबा सुटल्याने ट्रक खोलदरीत कोसळला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. सुमारे शंभर फूट दरीत ट्रक खाली गेल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक चालकाला अपघातात मार लागल्याने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
जानेवारी महिन्यात याच माणिकदौंडी घाटात ऊस तोडणी कामगाराच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात होऊन पती-पत्नी ठार तर पाच कामगार जखमी झाले होते. तर मागील महिन्यात पुन्हा कामगाराची ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन आठ कामगार जखमी झाले होते. यापूर्वीही माणिकदौंडी घाटामध्ये अनेक अपघात घडले असून अपघाताची मालिका वारंवार सुरू आहे. या घाटात वारंवार होणार्या अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या ठिकाणी असलेले धोकादायक वळण व तीव्र उतारा कमी करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांसह प्रवाशांकडून होत आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होऊ लागली आहे. अधिक तपास पोलीस अमंलदार सुहास गायकवाड करीत आहेत.
Web Title: Truck falls into ravine after driver loses control, truck driver killed