नाशिक-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; आईचा मृत्यू तर मुलगा जखमी
Breaking News | Ghargaon: दुचाकीचा वेग कमी केल्याने पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आईचा मृत्यू झाला.
घारगाव: गतीरोधकावर दुचाकीचा वेग कमी केल्याने पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात आईचा मृत्यू झाला तर तिचा तरुण मुलगा जखमी झाला. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात मंगळवारी (दि.16 रोजी) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रतीककुमार सुनील कवडे (वय 27, शनीमंदिर मळा, ओझर, ता.जुन्नर, जि.पुणे) याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक मधुकर महादेव वारे (वय 38, रा.हिरडपुरी, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) याचेविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रतीककुमार कवडे व त्याची आई पुष्पा हे दोघे मायलेक मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गाने दुचाकीवरून (क्र. एम.एच.14, ए.टी.756) आळेफाट्याच्या दिशेने येत होते. ते डोंगरे फर्निचर समोर असलेल्या गतीरोधाजवळ आले असता प्रतीककुमारने दुचाकीचा वेग कमी केला. त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या चालक चालकाने (क्र. एन.एल.01, ए.एफ.9066) चालक मधुकर वारे याने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने चालवून त्यांच्या दुचाकीला धडक (Bike Hite) दिली. यात प्रतीककुमारची आई पुष्पा यांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू (Death) झाला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस नाईक शिंगाडे हे करीत आहेत.
Web Title: Truck collides with two-wheeler on Nashik-Pune highway Mother died and son injured
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study