संगमनेर: साईभक्तांच्या कारला ट्रकची धडक दोन्ही वाहने उलटली
Sangamner Accident: अपघातात दोन्ही वाहने उलटली. कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांपैकी एका महिलेचा हात फॅक्चर झाला असून इतरांना मुका मार लागला.
संगमनेर : शिर्डी येथून श्री. साईबाबांचे दर्शन घेऊन पुणे येथे निघालेल्या साईभक्तांच्या कारला समोरून ट्रकची धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहने उलटली. कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांपैकी एका महिलेचा हात फॅक्चर झाला असून इतरांना मुका मार लागला. हा अपघात शनिवारी (दि. १८) संध्याकाळी नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी शिवारात घडला. ट्रकचालक तेथून पळून गेला होता.
श्रीनिवास चिवटे, रचना श्रीनिवास परिसरातील चिवटे, शामला अनिल चिवटे, लहान मुलगी अर्णा श्रीनिवास चिवटे आणि कारचालक राजू कांबळे (सर्व रा. पुणे) हे कारमधून प्रवास करत होते. नाशिक-पुणे महामार्गावर काम सुरू आहे, त्यामुळे चंदनापुरी शिवारात एकाच लेनवर वाहतूक सुरू आहे. वाहने उलटली. ट्रकची धडक बसल्याने कार उलटली कांबळे यांच्या कारच्या समोर मालवाहू ट्रक वेगाने आला आणि कारला धडक बसली. कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली आणि ट्रक उलटला. रस्त्यावरच ग्रामस्थांनी कारमधील पाचही जणांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी मेडीकव्हर हॉस्पिटल येथे दाखल केले.
Web Title: truck collided with a Sai Bhakta’s car and both vehicles overturned
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News