Home अहमदनगर रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक  जाळ्यात, ४० टन तांदूळ जप्त

रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक  जाळ्यात, ४० टन तांदूळ जप्त

Ahmednagar: पोलिसांनी याच ट्रकमधून रेशनचा काळ्या बाजारात जाणारा तांदूळ जप्त केला, ४० टन धान्य जप्त (seized) : ५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, शेवगाव पोलिसांची कामगिरी.

Truck carrying ration rice in net, 40 tonnes of rice seized

शेवगाव : रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा माल घेऊन निघाला आहे, अशी खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला अन् पाठलाग सुरू केला. पुढे अर्धा किलोमीटर अंतरावरच पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेत रेशनच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत ९ लाख रुपये किमतीचा ४० टन तांदूळ व ट्रक असा एकूण ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शुक्रवारी रात्री येथील नेवासा रोडवर ही कारवाई करण्यात आली.

शेवगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांना शुक्रवारी रात्री रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची खबर मिळाली होती. ट्रक क्रमांक (एमएच १६, सीडी ७१८०) मधून ही वाहतूक होत असून, या ट्रकच्या पाठीमागे ‘आशिकी’ चित्रपटातील चित्र रेखाटलेले व ड्रीमगर्ल असे लिहिलेले आहे, अशी अतिरिक्त माहिती खबऱ्याने पालिसांना दिली. हा ट्रक पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला आणि ट्रकचा पाठलाग सुरू केला. ट्रक शेवगाव शहरातून नेवासा रोडच्या दिशेने निघाला. पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी हा ट्रक पकडला. यावेळी चालक बाळू सूर्यभान कोकाटे (वय २५, रा. झापेवाडी, ता. शिरुर कासार, जि. बीड) व क्लिनर प्रवीण अशोक ढोले (वय २०, रा. गदेवाडी, ता. पाथर्डी) या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केला असता, त्यांनी हा तांदूळ शेवगाव शहरातील रेणुकानगर येथून भरल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

चालकाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिथे जाऊन भीमा मारुती गायकवाड यांच्या घरी तपास केला. यावेळी त्याच्या घरात स्वस्त धान्य दुकानातील शासकीय तांदळाचा मोठा साठा आढळून आला. यावेळी त्या साठ्यावर निगराणी ठेवण्यासाठी दोन पोलिसांची तत्काळ नेमणूक करून पोलिसांनी निवासी नायब तहसीलदार राहुल गुरव यांना पाचारण करून या धान्य साठ्याचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, विश्वास पावरा, हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, सोमनाथ घुगे, अशोक लिंपणे, संतोष काकडे, अमोल ढाळे, महिला पोलिस कर्मचारी शीतल गुंजाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

किती आरोपींचा सहभाग

पोलिसांनी पकडलेला रेशनचा तांदूळ कोणत्या दुकानातून आला होता, तो कोठे नेला जात होता, यात कुणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यात अनेक मोठी नावे समोर येणार असल्याची चर्चा शेवगाव शहरात रंगली आहे.

हा तांदूळ कोठून आणला होता, कोणाचा होता, कुठे घेऊन जाणार होता, कोणते दुकानदार, व्यापायांचा यात सहभाग आहे, याबाबत अधिकचा तपास सुरु आहे. या प्रकरणाशी निगडीत इतर आरोपींचा शोध घेतला जाईल.  विलास पुजारी, पोलिस निरीक्षक

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Truck carrying ration rice in net, 40 tonnes of rice seized

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here