सोयरीक पाहण्यासाठी जात असताना परिवारावर काळाचा घाला, अपघातात तिघांचा मृत्यू
Truck and Car Accident: ट्रक आणि कारचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी सोयरिक पाहण्यासाठी जात असताना अपघात.
सोलापूर : कर्नाटकातील इंडी येथून आळंदला जात असताना ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे हा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील इंडी येथून परिवार गुलबर्गा जिल्ह्यातील आळंदी येथे सोयरीक पाहण्यासाठी जात होते. कार शिरवळ येथे पोहचली असता समोरून भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकने समोरून धडक दिली. यात कारचा चक्काचूर झाला आहे.
शिरवळ येथे झालेल्या भीषण अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतांची ओळख पटलेली नसून मृतांमध्ये एक पुरुष, एक महिला आणि लहान बालकाचा समावेश आहे. तर अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
Web Title: Truck and Car Accident Three death
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App