Home अकोले भंडारदरा धरणात बुडून आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू

भंडारदरा धरणात बुडून आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू

Breaking News | Akole:  भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये असलेल्या लव्हाळवाडी येथील एका आदिवासी शेतकरी तरुणाचा भंडारदरा धरणामध्ये पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना.

Tribal farmer dies after drowning in Bhandardara dam

भंडारदरा: अकोले तालुक्यातीत भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये असलेल्या लव्हाळवाडी येथील एका आदिवासी शेतकरी तरुणाचा भंडारदरा धरणामध्ये पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, हा तरुण लव्हाळ्याडीच्या आदिवासी नृत्य सादर करणाऱ्या पथकातील प्रमुख कलाकार होता.

अकोले तालुक्यातील आदिवासी भानात असणाऱ्या लव्हाळवाडी येथील ज्ञानेश्वर देवु उघडे (वय ३८) या तरुणाचा भंडारदरा धरणाच्या घामामध्ये गाय घसरून पडल्याची घटना घडली असून त्यातच त्याचा अंत झाला आहे. ज्ञानेश्वर हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास लव्हाळवाडीपासून जवळच असणाऱ्या साम्रद गावाकडे जाणाऱ्या केटी वेअरजवळील शेतामध्ये भाजी आगण्यासाठी नेला होता. संध्याकाळ झाली तरी ज्ञानेश्वर घरी पोहोचला नाही, त्यामुळे त्याच्या घरच्या व्यक्तींनी त्याची शोधाशोध सुरू केली. त्यावेळी के टी वेअरच्या जवळच पाण्यामध्ये ज्ञानेश्वरचे चर्किन आढळून आले. रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह के टी वेअरच्या जवळच पाण्यावर तरंगताना आढळून आला. या परिसरात प्रचंड हवा असल्याने जनेश्वरचा तोल गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्ञानेश्वर हा अट्टल पोहोणारा होता, मात्र गत यहा-वारा दिवसांपासून भंडारदऱ्याच्या संपूर्ण परिसरामध्ये अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा प्रचंड मोठा लोंढा असतो. ज्ञानेश्वर लव्हाळवाडीच्या आदिवासी नृत्य पथकातील एक उत्तम कलाकार होता. त्याच्या आकस्मित निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजूर पोलिसांनी घटनास्थळावर जात पंचनामा केला असून राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविला आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Tribal farmer dies after drowning in Bhandardara dam

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here