अहमदनगर: ट्रॅव्हल्स बस-कारची समोरासमोर धडक; एक ठार, तीन जखमी
Breaking News | Ahmednagar Accident: ट्रॅव्हल्स बस आणि कार यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातामध्ये दोन वर्षाची मुलगी जागीच ठार.
पाथर्डी: तालुक्यातील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी गावाजवळ रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्स बस आणि कार यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातामध्ये दोन वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत करंजी पोलीस चौकीचे हवालदार भगवान टकले व महामार्ग पोलीस विभागाने दिलेल्या माहितीवरून रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डीकडून नगरकडे जात असलेल्या वॅग्नर कारला नगरकडून पाथर्डीकडे येत असलेल्या ट्रॅव्हल बसची जोराची धडक बसल्याने या अपघातामध्ये शुभांगी अभिजीत शिरसाठ (रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) या दोन वर्ष वयाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती समजताच करंजी पोलीस चौकीचे टकले, तसेच पोलीस महामार्ग विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर जखमींना तात्काळ नगरला पुढील उपचारासाठी हलवले. महामार्गावर घडलेल्या अपघातामुळे मोहटादेवी दर्शनासाठी जाणार्या भाविकांसह वाहनांची देखील मोठी गर्दी अपघातस्थळी झाली. त्यामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने अपघातानंतर काही वेळातच दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला केल्याने वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली.
Web Title: Travels bus-car head-on collision kill one
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study