वेश्या व्यवसायासाठी बांगला देशातून मुलींची तस्करी
बांगला देशातील अल्पवयीन मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसाय (Prostitution Business), मानवी तस्करी केल्याबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे दाखल.
सांगली : बांगला देशातील अल्पवयीन मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेसह दोघांना सांगली पोलीसांनी अटक केली. यातील एका संशयिताला पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सागरपारा गावातून अटक करण्यात आली.
काही दिवसापुर्वी मिरजेत राहणाऱ्या रुपा उर्फ सपना अबुलकाशीम शेख या महिलेला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीवेळी ती महिला बांगला देशातील असल्याची व कालू नावाच्या मध्यस्तामार्फत मुलीला आणल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे मध्यस्थ कालू उर्फ खालीक रियाजुद्दीन मंडल याला अटक करण्यात आली. या दोघा विरुध्द मानवी तस्करी केल्याबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उप निरीक्षक पंकज मोरे, हवालदार संजय कांबळे, प्रकाश पाटील, इम्रान मुल्ला, अनिता गायकवाड, प्रतिक्षा गुरव आदींच्या पथकाने केली.
वेश्या व्यवसायप्रकरणी महिलेला अटक
पिंपरी | पुणे : एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच महिलेला सदनिका उपलब्ध करून दिल्याबद्दल मालकावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुरुवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजता चिखली प्राधिकरणात ही कारवाई केली.
पोलीस अंमलदार सुनील शिरसाट यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला आणि आर. डी. लांडगे (वय ४०, रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलेने एका पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेवर महिलेने आपली उपजीविका भागवली.
तर, आरोपी लांडगे याने आरोपी महिलेला कोणताही भाडेकरारनामा न करता वेश्याव्यवसायासाठी सदनिका उपलब्ध करून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे.
Web Title: Trafficking of girls from Bangladesh for prostitution
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App