Accident: संगमनेर शहरात ट्रॅक्टर ट्रोली व दुचाकीत अपघात
संगमनेर | Accident: ट्रॅक्टर ट्रोली व दुचाकी यांच्यात संगमनेर शहरातील राज फोटो स्टुडीओच्या समोर सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात एक २४ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी झालेल्या युवकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्नील काशिनाथ घुले रा. अमृतवाहिनी महाविद्यालय संगमनेर असे या गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताच्या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
स्वप्नील घुले हा त्यांच्या ताब्यातील दुचाकीहून साळीवाडा येथून राज फोटो स्टुडीओ च्या समोरून जात होता. त्यावेळी अकोले नाक्याकडून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टर दुचाकीला धडक दिली. या धडकेत स्वप्नील घुले हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
Web Title: Tractor and Bike Sangamner Accident