अहमदनगर: पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
श्रीगोंदा : म्हसे (ता. श्रीगोंदा) येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.१३) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. शुभम अशोक पाडवी (वय अडीच वर्षे, ता. धाडगाव, रा. नंदूरबार) असे मृत मुलाचे नाव आहे.
बाळासाहेब मुरलीधर पवार (रा. म्हसे, ता. श्रीगोंदा) यांच्या येथे नंदूरबार येथील अशोक पाडवी यांचे कुटुंब दोन वर्षापासून शेतीचे काम करण्यासाठी आले आहे. शनिवारी सकाळी साधारण साडेअकराच्या दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने शुभम पाडवी या अडीच वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला केला. हल्ला एवढा भयानक होता की त्याच्या तोंडावर आणि छातीवर जखमा झाल्या. त्याच अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी त्याला मृत घोषित केले. दुसरा पाच वर्षाचा मुलगा आदेश पाडवी याच्या हातालाही कुत्र्याने चावा घेतला. तो पळाल्यामुळे वाचला.
Web Title: Toddler dies after being attacked by a vicious dog
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study