Home अहिल्यानगर अहिल्यानगर: दुचाकीस्वाराला वाचवायला गेला अन अनर्थ, कार पलटी

अहिल्यानगर: दुचाकीस्वाराला वाचवायला गेला अन अनर्थ, कार पलटी

Breaking News  Ahilyanagar Accident: समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना कार थेट रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना.

to save the bike rider and unfortunately, the car overturned Accident

अहिल्यानगर: राहाता: महामार्गावर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवताना कार थेट रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना राहाता तालुक्यातील नांदूर शिवारात घडली आहे. या अपघातात गाडीत बसलेले पाच तरुण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी तरुणांना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन जण गंभीर जखमी आहेत.

बाभळेश्वर- श्रीरामपूर महामार्गावर नांदूर परिसरात एका दुचाकीस्वाराला वाचवताना गाडी खड्डयात पडल्याची घटना घडली. या अपघातात जखमी पाचही तरुण श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी असल्याचे समजते. तर दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे. या अपघातात पाच तरुण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघे गंभीर जखमी असल्याने नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: to save the bike rider and unfortunately, the car overturned Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here