Home अहमदनगर अहिल्यानगर: सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या

अहिल्यानगर: सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून तरुणाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली, ठाण्यात तिघा सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

Tired of moneylender's investigation, youth commits suicide

जामखेड : खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून तालुक्यातील अरणगाव येथील कालिदास अभिमन्यू मिसाळ (वय ४०) या तरुणाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात तिघा सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मृताचा भाऊ जगदीश अभिमन्यू मिसाळ (वय ४३, रा. अरणगाव, ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आलेश बाबूराव जगदाळे (रा. जामखेड), भगवान रामा जायभाय । (रा. वंजारवाडी, ता. जामखेड) व शायरा नियमत सय्यद (रा. पाटोदा । गरडाचे, ता. जामखेड) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून : याप्रकरणी पोलिसांनी भगवान जायभाय यास सोमवारी रात्री उशिरा अटक केली.

आत्महत्या केलेला कालिदास मिसाळ याने आरोपी आलेश बाबूराव जगदाळे याच्याकडून दोन वर्षांपूर्वी शेतीच्या कामासाठी १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याच्या मोबदल्यात कालिदास व त्याच्या मुलाने १४ महिने जगदाळे याच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम केले. तरीही जगदाळे हा कालिदास याच्याकडे एक लाख रुपये कर्जाचे व्याज व मुद्दल असे एकूण ३ लाख रुपयांची मागणी करून धमकी देत होता. दुसरा सावकार भगवान रामा जायभाय याच्याकडून कालिदास याने ३० हजार रुपये घेतले होते. या कर्जाच्या व्याजापोटी जायभाय हा १ लाख २५ हजार रुपयांची मागणी करत होता. तसेच शायरा नियामत सय्यद हिच्याकडून देखील कालिदास याने ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. व्याजापोटी व मुद्दल असे मिळून ती ४० हजार रुपयांची मागणी करत होती. पैशासाठी तीनही सावकार कालिदास याला त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून कालिदास याने १४ ऑक्टोबर रोजी पहाटे त्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान मृताने डायरीत लिहिलेल्या पानावर ‘आलेश बाबूराव जगदाळे व भगवान रामा जायभाय यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे’ असे लिहिलेले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.

फोन केल्याने कळाले तिसऱ्या सावकाराचे नाव कालिदास याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणला होता. याचवेळी शायरा नियामत सय्यद हिचा मृत कालिदास याच्या मोबाइलवर फोन आला. हा कॉल कालिदास याच्या भावाने उचलला तेव्हा शायरा म्हणाली कालिदास मिसाळ कोठे आहे, त्याच्याकडे असलेले माझे पैसें मला पाहिजेत त्याच्याकडे फोन द्या, यावेळी फिर्यादी याने सांगितले की, माझ्या भावाने आत्महत्या केली आहे. असे म्हणताच तिने फोन बंद केला.

Web Title: Tired of moneylender’s investigation, youth commits suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here