मला जगायचा कंटाळा आलाय, म्हणून…. चिठ्ठी लिहून आत्महत्या
मला जगायचा कंटाळा आलाय, म्हणून मी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून परतूर तालुक्यातील शिंगोना येथील २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) आत्महत्या केल्याची घटना.
परतूर | जालना: मला जगायचा कंटाळा आलाय, म्हणून मी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून परतूर तालुक्यातील शिंगोना येथील २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. अनिल यादवराव कांबळे असे मयत तरुणाचे नाव आहे.
अनिलची घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून, त्याचे आई- वडील बाहेरगावी शेतमजूर म्हणून काम करतात. अविवाहित असलेला अनिल गावातीलच मामाकडे राहतो.
मामाने त्याला ऑटोरिक्षा खरेदी करून दिली होती. तो ऑटोरिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवित होता. गेल्या काही दिवसांपासून मनस्थिती ठीक नसलेल्या अनिलने गुरुवारी दुपारी राहत्या घरात स्वतःला बंद करून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्यात मला जगायचा कंटाळा आलाय, असे म्हणून मी आत्महत्या करतोय. असा मजकूर लिहिलेला आहे. रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: tired of living, so…. commit suicide by writing a note
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App