Home अहमदनगर अहिल्यानगर: हात-पाय बांधले; दगडाची गोणी बांधून विहिरीत फेकले

अहिल्यानगर: हात-पाय बांधले; दगडाची गोणी बांधून विहिरीत फेकले

Ahilyanagar Crime: राहुरी येथील वकील दाम्पत्याचा डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून निर्घुण पणे  खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकल्याची कबुली माफीचा साक्षीदार असलेला हर्षल ढोकणे याने मंगळवारी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर दिली. दरम्यान, उलटतपासणीत माफीच्या साक्षीदाराला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. 

Crime tied hand and foot A stone sack was tied and thrown into the well

अहिल्यानगर:   राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अ‍ॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अ‍ॅड. मनीषा आढाव (दोघे रा. मानोरी, ता. राहुरी) यांच्या अपहरणानंतर त्यांच्या डोक्यात प्लास्टिक पिशवी घालून, त्यांचे हात- पाय साडीने बांधून, त्याला दगडाची गोणी बांधून त्यांना उंबरे गावातील स्मशानभूमीजवळ विहिरीत टाकले. तसेच अ‍ॅड. आढाव यांच्या एटीएममधून काही रक्कम संशयित आरोपींनी काढून घेतली, अ‍ॅड. आढाव यांच्या पत्नीच्या हातातील ब्रेसलेट काढून घेतल्याचे माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) याने न्यायालयासमोर सांगितले. दरम्यान संशयित आरोपीच्या वकिलांकडून ढोकणे याची उलट तपासणी सुरू झाली आहे.

राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय 32, रा. उंबरे, ता. राहुरी), भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी), शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी, ता. राहुरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी), कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे (रा. राहुरी) यांना अटक केलेली आहे. सोमवारी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षाकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम व मुख्य संशयित आरोपी किरण दुशिंग याच्या वतीने अ‍ॅड. सतीश वाणी यांनी बाजू मांडली. माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयासमोर वकील दाम्पत्याचे अपहरण कसे केले, यात कोणकोण सहभागी होते, कट कसा रचला याचा घटनाक्रम सांगितला होता.

मंगळवारी ढोकणे याने पुढील घटनाक्रम सांगितला. आढाव दाम्पत्याला त्यांच्याच घरात बाधून ठेवले होते. तेथे त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेऊन पैसे काढून घेतले. हातातील ब्रेसलेट काढून घेतले. न्यायालयात या दोन्ही वस्तू ढोकणे याने ओळखल्या. संशयित आरोपींनी आढाव यांच्याकडे अधिक रकमेसाठी तगादा लावला. त्यानंतर आढाव यांचीचे वाहन घेऊन त्यांना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास उंबरे येथील स्मशानभूमी येथे आणले. त्यांचे हात, पाय बांधले, दगडाची गोणी बांधून विहिरीत टाकले. तेथून आढाव यांचे वाहन राहुरी न्यायालयाच्या आवारात आणून लावले. संशयित आरोपी तेथून जात असताना तेथे पोलिसांचे एक वाहनही आले होते, असे ढोकणे याने सांगितले.

त्यानंतर माफीचा साक्षीदार ढोकणे याची संशयित आरोपीचे वकील सतीश वाणी यांनी उलटतपासणी सुरू केली. मी न्यायदंडाधिकारी यांनी नोंदविलेला जबाब वाचून पाहीला होता. मी 27 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात होतो. मला त्यांनी गुन्ह्याबद्दल विचारपुस केली होती. त्या चौकशीदरम्यान माझेकडून काहीही लिहून घेतले नव्हते. एलसीबीने मला गुन्हासंबंधी कबूली जबाब द्यायचा का, असे सांगितले नव्हते. मी पोलिसांना सांगीतले होते की, मला पश्चाताप झाला आहे, असे ढोकणे याने सांगितले.

Web Title: Crime tied hand and foot A stone sack was tied and thrown into the well

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here