भरदिवसा रस्त्यावर गोळीबाराचा थरार! दोन जणांनी दुचाकीवरून येऊन तरुणावर गोळीबार
Breaking News | Pune Crime: पुण्याच्या बिबवेवाडी भागातल्या वर्दळीच्या ठिकाणी हा गोळीबार (Fired) झाला आहे. दोन जणांनी दुचाकीवरून येऊन 28 वर्षांच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या.
पुणे : पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे. पुण्याच्या बिबवेवाडी भागातल्या वर्दळीच्या ठिकाणी हा गोळीबार (Firing) झाला आहे. दोन जणांनी दुचाकीवरून येऊन 28 वर्षांच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. बिबवेवाडी पोलीस स्टेशनपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर दिवसाढवळ्या हा गोळीबार झाला आहे, त्यामुळे पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
चार जणांच्या टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात 28 वर्षांचे पवन सुभाष गवळी जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर पवन गवळी यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आलं. गोळीबारामध्ये गवळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवन गवळी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तिकडून पसार झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरूवात केली आहे.
बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दुपारी 1 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास बीआयटी कॉलेज रोडवर पासलकर कमानीच्या खाली दोन अज्ञात इसमांनी मोटर सायकलवर येऊन अग्निशस्त्राने फायरिंग केली आहे. या हल्ल्यात गवळी यांच्या कंबरेला गोळी लागली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या गवळी यांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करत आहोत, अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे यांनी दिली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: thrill of shooting on the street in broad daylight! Two people came on a bike and fired
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News