Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर बर्निंग कारचा थरार!

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर बर्निंग कारचा थरार!

Breaking News  Sangamner: नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव बसस्थानकावर नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या क्विड कारने अचानक पेट घेतल्याची घटना.

thrill of burning cars on the Pune Nashik highway

घारगाव : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव बसस्थानकावर नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या क्विड कारने अचानक पेट घेतल्याची घटना काल शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास घडली आहे.

नाशिक येथील रहिवासी असलेला तरुण यश भांबेरे रेनॉल्ड कंपनीची क्लिड कार क्रमांक एम एच १५ एफ टी ९७०३ या गाडीतून आपल्या बहिणीला पुण्याला सोडविण्यासाठी जात असताना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव बसस्थानक परिसरात ते ४ वाजून ४५

मिनिटांच्या सुमारास आले असता. धावत्या कारने अचानक पेट घेतला, महामार्गावरील वाहन चालक व स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने प्रसंगावधन साधत गाडी थांबविण्यास भाग पाडले. गाडीतील भाऊ बहिणीला गाडीतून उतरविले. भेदरलेल्या परिस्थितीत त्यांनी देखील तत्काळ गाडीचा ताबा सोडत सुरक्षित ठिकाणी जाऊन आसरा घेतला. यादरम्यान घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने, पोलिस प्रमोद गाडेकर इतर पोलिस कर्मचारी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला.

Web Title: thrill of burning cars on the Pune Nashik highway!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here