बर्निंग कारचा थरार, अचानक पेट घेतल्याने खळबळ
Burning car: कार जळून खाक.
पिंपरी: चालत्या ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दरम्यान, चालकाने तत्काळ कारबाहेर उडी घेतल्याने जीवितहानी टळली. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडेदहा वाजता संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, कारमालक मंगेश ठोंबरे हे त्यांच्या ओमनी (एमएच १२ / एएक्स ५७८७ ) थरमॅक्स चौकाकडून केएसबी चौकाकडे जात होते. एच पी पेट्रोल पंपाच्या पुढे आल्यानंतर कारने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत ठोंबरे कारमधून बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली असून बघ्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला.
Web Title: Thrill of a burning car, the thrill of suddenly catching fire
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App