नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुण मित्रांचा नदीपात्रात बुडून मृत्यू
Chhatarapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यातील शेलगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुण मित्रांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना.
संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील शेलगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुण मित्रांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. ३० बुधवार रोजी ४ वाजेदरम्यान उघडकीस आली, ऐन दिवाळीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने शेलगाव शिवारावर शोककळा पसरली आहे.
सदरील माहिती अशी की, आवेज नवीद पटेल (वय २१), अफरोज शिराज पठाण (वय२३), अल्ताफ राजू पटेल (वय १९, सर्व रा. शेलगाव ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे पूर्णा नदीपात्रात बुधवारी (दि.३०) पोहायला गेले होते, परंतु नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती शेलगाव येथील पोलीस पाटील सलीम पटेल यानी पिशोर पोलिसांना दिली. तत्परतेने पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही फरताडे, बिट अंमलदार किरण गंडे, अन्सार पटेल, भताने, यांनी घटनास्थळी धाव घेत सदरील घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास सपोनि शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक फरताडे करीत आहे. पोलिसांनी मृत अफरोज मृत अल्ताफ मृत आवेज घटनास्थळी भेट देवून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवेज पटेल याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, अल्ताफ पटेल याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, तीन बहिणी, तर अफ्रोज पठाण यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. या तरुणांचे शवविच्छेदन गुरुवारी (दि.३१) करण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Web Title: Three young friends who went swimming in the river drowned in the river
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study