अहमदनगर: तीन वर्षीय मुलाचा हौदात बुडून मृत्यू
Breaking News | Ahmednagar: गल्लीत खेळत असताना हौदात पडून एका तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू.
अहमदनगर : गल्लीत खेळत असताना हौदात पडून एका तीनवर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुकुंदनगर परिसरातील साजीनगर येथे रविवारी (दि. ४) साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
समर इम्रान शेख (वय ३ वर्षे, रा. साजीनगर, मुकुंदनगर), असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता १०५, १२५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
अल्ताफ शफी सय्यद असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत इम्रान महंमद शफी शेख यांनी फिर्याद दिली आहे. मयत मुलगा खेळत असताना आरोपीच्या दुकानासमोर असलेल्या हौदाजवळ गेला. हौदावर झाकण नसल्याने मुलगा हौदात पडला. हौद पाण्याचे भरलेला होता. बराचवेळ झाला तरी मुलगा घरी आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी शोध घेतला असता मुलाचा मृतदेह हौदात मिळून आला. यावेळी नातेवाइकांसह मोठा जमाव जमला होता. हौद उघडा ठेवल्याने मुलाचा मृत्यू झाल्याने संबंधितावर कारवाईची मागणी केली. भिंगारचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी भेट दिली.
Web Title: three-year-old boy drowned in a well
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study