मुसळधार, तिघे पुराच्या पाण्यात वाहून गेले; दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता
Breaking New | Nagpur: मुसळधार पावसामुळे तीन जण वाहून गेल्याची माहिती समोर.
नागपूर : नागपूर शहरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तीन जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामधील दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. तर एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. नागपूर (शहर) तहसीलदार संतोष खांदेरे यांनी भरतवाडा, पूनापूर आणि सोमलवाडा येथील तलाठ्यांचा प्राथमिक तपास अहवाल रविवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सादर केला आहे. अतिवृष्टीमुळे तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे या अहवालात आढळून आले आहे.
पुनापूर परिसरातील श्यामनगर येथील भोजराज बुलीचंद पटले (५२) हे नाल्याच्या काठावर उभे असताना अचानक पाय घसरल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचा मृतदेह सापडला असून नाल्याच्या बाहेर काढण्यात आला असून मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला. भरतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहनबाबा नगर परिसरात नाल्याच्या काठावर खेळत असताना श्रावण विजय तुळशीकर (१२) हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे मुलाचा मृतदेह अद्याप सापडलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.
तर अन्य एका अपघातात बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीतील नरेंद्र नगर परिसरातील श्रीहरी सोसायटीतील सुधा विश्वेश्वरराव वेरूळकर (८५) या मतिमंद महिला बेलतरोडी बेसा येथे जवळच्या नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह श्यामनगर परिसरातील नाल्यात आढळून आला. त्यानंतर मृतदेह (Dead body) बाहेर काढण्यात आला.
Web Title: Three were swept away by floodwaters Two dead, one missing
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study