बंधाऱ्यात बुडून २ सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू
Breaking News | Kolhapur: बंधाऱ्यात बुडून दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू.
आजरा (जि. कोल्हापूर) : आजऱ्याजवळील परोली बंधाऱ्यात बुडून दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी चार वाजता घडली. मृतांमध्ये रोझारिओ अंतोन कुतिन्हो (वय ४१), फिलीप अंतोन कुतिन्हो (वय ३६), लॉइड पास्कोन कुतिन्हो (वय ३६, तिघेही रा. आजरा, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे,
सर्वजण एकत्र जमले होते. रोझारिओ हे वकील, फिलीप हे आयटी इंजिनिअर, तर लॉइड हे मर्चेंट नेव्हीमध्ये नोकरीस होते. रविवारी दुपारी हे सर्वजण पोहण्यास गेले होते. चित्री धरणातून पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढला होता. बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रथम रोझारिओ व फिलीप पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी लॉइड गेले असता, तेही बुडाले.
Web Title: Three people including 2 Sakkhya brothers died after drowning in the dam
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News