Home परभणी शिक्षक कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

शिक्षक कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

Maharashtra Suicide Case: रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलाजवळ रेल्वे रूळावर झोपून मालगाडीखाली आई- वडील आणि मुलीने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.

Three members of a teacher's family committed suicide under the train

गंगाखेड : गंगाखेड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या धारखेड शिवारात रेल्वे पुलाजवळ रेल्वे रूळावर झोपून मालगाडीखाली आई- वडील आणि मुलीने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता घडली. या घटनेने गंगाखेड शहर हादरले.

शहरातील एका खासगी विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मसनाजी सुभाष तुडमे (४५), त्यांची पत्नी रंजनाबाई मसनाजी तुडमे (४०), मुलगी अंजली मसनाजी तुडमे (२१, सर्व राहणार किनी कद्दू, ता. अहमदपूर, जि. लातूर, हल्ली मुक्काम गंगाखेड) या तिघांनी रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या परभणी रेल्वे मार्गावर धारखेड शिवारातील रेल्वे पटरीवर झोपून मालगाडीखाली आत्महत्या केली.

दरम्यान, या कुटुंबीयांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक असेफ शेख, जमादार दीपक वावळे व गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. मयत मसनाजी तुडमे यांच्या खिशात असलेल्या मोबाईलवरून नातेवाईकांशी संपर्क साधून तिघांची ओळख पटवण्यात आली.

Web Title: Three members of a teacher’s family committed suicide under the train

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here