Home संगमनेर संगमनेर तालुक्यात अखेर तीन बिबटे जेरबंद

संगमनेर तालुक्यात अखेर तीन बिबटे जेरबंद

Breaking News | Sangamner: तीन दिवसांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला  यश आले.

three leopards were jailed in Sangamner taluka

संगमनेर: तालुक्यातील निमगाव टेंभी परिसरात शनिवारी (दि.19) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अडीच ते तीनवर्षीय मादी बिबट्याला जेरबंद केले असून तीन दिवसांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला  यश आले आहे. दरम्यान, या पकडलेल्या बिबट्यांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच नरभक्षक बिबट्या ओळखता येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (भाग एक) सचिन लोंढे यांनी दिली.

निमगाव टेंभी शिवारात गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संगीता शिवाजी वर्पे या महिलेवर अचानक हल्ला करत ठार केले होते. यानंतर वन विभागाच्या विरोधात परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. याची गांभीर्याने दखल घेत ठिकठिकाणी पिंजरे लावले. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी थर्मल ड्रोनचा वापर केला तरीही बिबट्या जेरबंद झाला नव्हता.

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र देवगावच्या घटनेनंतर वन विभाग खडबडून जागा झाला असून दोन दिवसांत देवगाव, हिवरगाव पावसा परिसरात बिबटे जेरबंद केल्यानंतर शुक्रवारी दुपारी निमगाव टेंभी परिसरात उसामध्ये बिबट्या असल्याचे समजताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेतली आणि रेस्क्यू पथकाने जाळी टाकून बिबट्याला पकडत बेशुद्ध करत जेरबंद केले. यानंतर संगमनेर खुर्द रोपवाटिकेत त्यास नेण्यात आले. तीन दिवसांत तीन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला मोठे यश आले आहे. मात्र, अजूनही नागरिकांत भीतीचे सावट दाटलेले आहे.

बिबट्यांनी ज्या महिलांवर हल्ले करून त्यांना ठार केले आहे. त्या महिलांच्या जखमांचे नमुने घेण्यात आले होते. यानंतर आता पकडलेल्या बिबट्यांच्या लाळ आणि रक्ताचे नमुने घेवून हे सर्व नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसठी पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर कोणत्या बिबट्याने हल्ला केला आहे हे ओळखता येणार आहे.

Web Title: three leopards were jailed in Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here