Home अकोले अकोले तालुक्यात पिकअप आणि दुचाकीच्या अपघातात तीनजण ठार

अकोले तालुक्यात पिकअप आणि दुचाकीच्या अपघातात तीनजण ठार

Breaking News | Akole Accident: तीन तरुण भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनांच्या धडकेत झालेल्या अपघातात ठार.

Three killed in an accident between a pickup and a two-wheeler in Akole 

अकोले: तालुक्यातील धुमाळवाडी व पिंपळगाव नाकविंदा येथील तीन तरुण भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनांच्या धडकेत झालेल्या अपघातात ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघातात धुमाळवाडी व पिंपळगाव नाकविंदा येथील तिघेजण जागेवरच ठार झाल्याची घटना मतदानाच्या दिवशी अकोल्यातील देवठाण ते सिन्नर रस्त्यावर घडली. तर या अपघातातील धुमाळवाडी येथील रहीवासी महिला ज्योती झोळेकर गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.

मोटारसायकल व पिकअपच्या झालेल्या भीषण अपघातात तीनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना देवठाण-सिन्नर रस्त्यावर घडली. मृतांमध्ये धुमाळवाडी व पिंपळगाव नाकविंदा येथील तरुणांचा समावेश आहे. अकोले विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावून गणेश भिकाजी झोळेकर, सर्वेश संतोष झोळेकर, अनिकेत सुभाष लगड व ज्योती सुभाष झोळेकर हे सिन्नरच्या दिशेने चालले होते. त्यावेळी देवठाण (ता.अकोले) गावाजवळील गायकवाड वस्तीजवळ हे सर्वजण रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव आलेल्या एका मालवाहू पिकअपने या चौघांना जोराची धडक दिली.

पिकअप गाडीची धडक जोराची बसल्याने गणेश झोळेकर, सर्वेश झोळेकर व अनिकेत लगड या तिघांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी सर्वांना तत्काळ अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिघांनाही मृत घोषित केले. ज्योती झोळेकर या महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघातातील मृत पावलेले तरुण अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याचे समजते. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान देवठाण-सिन्नर रस्त्यावर नेहमीच मालवाहू गाड्यांची रेलचेल असते. या वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे आपघातांचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा बेदरकारपणे मालवाहू करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अपघातानंतर मालवाहू पिकअप गाडी पोलिसांना अद्याप सापडलेली नाही.

Web Title: Three killed in an accident between a pickup and a two-wheeler in Akole 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here