Accident: कारच्या भीषण अपघातात तिघे ठार
Baramati Accident: कृजर कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातात तिघे ठार झाल्याची घटना मोरगाव रस्त्यावर घडली. कार चालक फरार.
बारामती : तालुक्यातील बारामती मोरगाव रस्त्यावर अर्बन क्रूजर कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. मोरगावकडून बारामतीकडे निघालेल्या तिघांना कारने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला.
दशरथ साहेबराव पिसाळ (62), अतुल गंगाराम राऊत (22) आणि त्यांची आई नंदा राऊत अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.
पिसाळ हे रस्त्यावरून जात होते. तर राऊत कुटुंबीय दुचाकीवरून प्रवास करत होते. याचदरम्यान तिघांना कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. नंदा राऊत या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत झालेले दशरश पिसाळ माळवाडी येथील फोंडवाडाचे रहिवाशी होते. तर राऊत कुटुंबीय करावागज येथे राहत होते. क्रूजर बारामतीहून पुण्याच्या दिशेनं निघाली होती. तर दुचाकी पुण्याहून बारमतीकडे रवाना झाली होती. फोंडवाडाजवळ कारने दुचाकील धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर अपघातात झालेली कार पोलिसांनी जप्त केली. परंतु, कारचालक फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. काल गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे वडगाव,निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली.
Web Title: Three killed in a horrific car accident
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App