Home संगमनेर संगमनेरात एकाच रात्रीत तीन घरे फोडली

संगमनेरात एकाच रात्रीत तीन घरे फोडली

Breaking News | Sangamner Crime:  एकाच रात्री तीन घरे फोडल्याची खळबळजनक घटना घडलीय.

Three houses were broken into in one night in Sangamner

संगमनेर: साकूर येथील पटेल गल्लीत एकाच रात्री दोन बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकाच रात्री तीन घरे फोडल्याची खळबळजनक घटना घडलीय. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. त्यामुळे साकूर परिसरात घबराट पसरली आहे. तसेच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरट्यांना जेरबंद करण्याच घारगाव पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

अधिक मिळालेली माहिती अशी की, साकूर येथील बिरोबाच्या मंदिरामागे विरभद्र नगर येथे सेवानिवृत्त ग्रामसेवक मिनीनाथ नन्नावरे, राहुल कारंडे, पुरूषोत्तम देशपांडे राहत आहे. रविवार मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी माजी ग्रामसेवक मिनीनाथ सोमनाथ नन्नावरे यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच घरात कपाटाची उचकापाचक केली. इतर ठिकाणी देखील उचकापाचक करत वस्तू अस्ताव्यस्त केल्या. तसेच चोरट्यांनी देव्हाऱ्यातील देव सुद्धा चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः मिनीनाथ नन्नावरे हे बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी डाव साधून त्यांच्या घरात चोरी केली.

तसेच राहुल लक्ष्मण कारंडे यांच्या घराचे देखील कुलूप तोडून चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. यावेळी काही नागरिकांनी जाग आली होती. अज्ञात चोरटे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याचबरोबर पुरुषोत्तम देशपांडे काका यांच्या घरात देखील चोरट्यांनी घुसून उचकापाचक केली आहे.

दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची माहिती राहुल कारंडे यांनी फोनद्वारे घारगाव पोलिस स्टेशनला दिली होती. मात्र फोनवर उलटसुलट उत्तरे पोलिसांनी दिली गेली. उलट या घटनेकडे दुर्लक्ष केले गेले. एवढ्या रात्री फोन करूनही घारगाव पोलिसांनी साधं गांभिर्य लक्षात घेतलं नाही. जर तात्काळ घटनास्थळी आले असते तर चोरट्यांचा काही ना काही सुगावा लागला असता. त्यामुळे ग्रामस्थांनी घारगाव पोलिसांवरच नाराजी व्यक्त केली आहे.

मात्र सदर घटनेची माहिती मिळताच नगरहून श्वान पथकासह ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिसांनी देखील सदर घटनेची चौकशी सुरू केली आहे.

एका पाठोपाठ दोन रात्रीत पाच घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरात अक्षरशः घबराट पसरली आहे. त्यामुळे अज्ञात चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Breaking News: Three houses were broken into in one night in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here