खेळता खेळता शेततळ्यात तोल गेल्याने एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू
सोलापूर | Solapure : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे शेततळ्यात पडून बुडाल्याने (Drowned) एकाच कुटुंबातील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
शेततळ्याच्या शेजारी खेळत असताना तोल जावून तीन मुलं पाण्यात बुडाल्याने तिघांचा अंत झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्तिकेश हिंगमीरे, सिद्धार्थ निकम, विनायक निकम अशी मृतांची नावं आहेत.
दरम्यान, निकम कुटुंबीय मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील डोंगरे शेतकऱ्याकडे काम करायचे. तर हिंगमीरे कुटुंबीय शेटफळ येथील रहिवासी होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Three children of the same family died Drowned in Farm