पाण्याच्या हौदात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू
शेतातील पाणी साठविण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या हौदात बुडून ( drowning) तीन शाळकरी मुलांचा मृत्यू.
बीड : शेतातील पाणी साठविण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या हौदात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान तालुक्यातील पैठण (सावळेश्वर) येथील शिवारात घडली. तीनही बालके सख्खे चुलत भाऊ आहेत.
स्वराज जयराम चौधरी (वय ९, इयत्ता तिसरी), पार्थ श्रीराम चौधरी (वय ७, इयत्ता पहिली) आणि कानिफनाथ गणेश चौधरी (वय ७, इयत्ता पहिली) अशी हौदात बुडून मृत्यू पावलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. पैठण (सावळेश्वर) येथील चुलत्याच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी ही तिन्ही मुले मंगळवारी सकाळी आईसोबत गेली होती. दुपारचे जेवण केल्यानंतर ही तिन्ही मुले जवळच असलेल्या झाडाखाली थांबली होती. तिघांच्या आई ज्वारी काढण्यात मग्न होत्या. यावेळी मुले ज्या ठिकाणी खेळत हौदात बुडून मृत्यू झाला. होती, त्या ठिकाणी ६ फूट खोल असलेल्या हौदात ५ फूट पाणी होते. खेळता-खेळता एक जण हौदात तोल जाऊन पडला. त्याला वाचविण्यासाठी भाऊ दुसरे दोघेही पाण्यात उतरले; परंतु यातील कोणालाही पोहता येत नसल्याने तिघेही बुडाले. जवळपास कोणीही नसल्याने, या तीनही मुलांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिन्ही मुलांचे मृतदेह हौदाबाहेर काढले.
Web Title: Three children died after drowning in a water tank
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App