Home अहिल्यानगर अहिल्यानगर: बनावट कागदपत्रांसह तिघा बांगलादेशींना घेतले ताब्यात

अहिल्यानगर: बनावट कागदपत्रांसह तिघा बांगलादेशींना घेतले ताब्यात

Breaking News | Ahilyanagar Crime: बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला.

Three Bangladeshis detained with fake documents

अहिल्यानगर बनावट आधार व पॅनकार्ड तयार करून राहत असलेल्या तिघा बांगलादेशींना पोखर्डी (ता. अहिल्यानगर) शिवारातून एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जहांगिर अबुताहेर (वय ३४, रा. चातूरठाण, हजीगंज, बांगलादेश), हनीफ अब्दुल खलीद शेख (वय ४०, रा. खाजीर खाली थाना, शेनबाग, बांगलादेश), मुश्रफ हबीब शेख (वय ४०, रा. चातूरठाण, हाजीगंज, बांगलादेश) असे ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींची नावे आहेत.

पोखर्डी (ता. अहिल्यानगर) शिवारातील वारुळेवस्ती येथील एका सिमेंटच्या खोलीत काही बांगलादेशी राहत असल्याची खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने वारुळे वस्ती येथे छापा टाकत तिघा बांगलादेशींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड मिळून आले. कोणताही व्हिजा अथवा परवाना नसताना घुसखोरी करून राहत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News: Three Bangladeshis detained with fake documents

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here