Home कोल्हापूर पतीला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहीतेवर अत्याचार

पतीला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहीतेवर अत्याचार

Breaking News | Kolhapur Crime:  एका विवाहितेला पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना समोर.

Threatening to kill the husband and child abused married woman

कोल्हापूर: बारडवाडी (ता. राधानगरी) येथील एका विवाहितेला पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत एकाने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर इतर दोघांनाही अश्लील फोटो काढून फोटो आणि त्याच्या संबंधाबाबत धमकावत शारीरिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राधानगरी पोलीसांनी तिघांना अटक केली. या तिघांना राधानगरी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील विवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून धमकावत फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२४ च्या दरम्यान फिर्यादीच्या घरी, आजीच्या घरी व एका महिलेच्या घरी शारीरिक संबंध प्रस्थापित करत अत्याचार केले. याबाबत मोहन रामचंद्र पोवार, सागर चंदर मोहिते, रवींद्र श्रीपती बारड यांना राधानगरी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर, प्रणाली पवार यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत.

Web Title: Threatening to kill the husband and child abused married woman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here