छगन भुजबळ यांना धमकी, पोलीस आयुक्तांकडे माहिती
Chhagan Bhujbal: ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर.
नाशिक: ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला आहे. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर धमकीचा फोन आलाय. भुजबळांकडून नाशिक पोलीस आयुक्तांकडे आलेल्या फोन संदर्भात माहिती देण्यात आली. याप्रकरणी नाशिक पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
छगन भुजबळ यांचं वक्तव्य आणि स्पष्टीकरण:
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (१९ ऑगस्ट) ब्राह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची नावं संभाजी आणि शिवाजी अशी ठेवत नाहीत, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ब्राह्मण महासंघासह राजकीय पातळीवरून टीका होत आहे. या टीकेनंतर भुजबळ यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बातचित केली आणि आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. छगन भुजबळ म्हणाले, कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही.
Web Title: Threat to Chhagan Bhujbal
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App