१४ गावांमध्ये थोरात विरुद्ध विखे गटात चुरस, संगमनेर तालुक्यात इतके टक्के मतदान
Sangamner Gram Panchayat Election: सरासरी ८० टक्के मतदान.
संगमनेर: तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १८) मतदानाची प्रक्रिया पार पडली. सरासरी ८० टक्के मतदान झाले. ९८ हजार ३ मतदारांपैकी अंदाजित ७८ हजार ९१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३७ हजार १५३ महिला मतदारांनी तर ४१ हजार ७६५ पुरुष मतदारांनी मतदान केले. रात्री उशिरापर्यंत माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.
घुलेवाडी, साकूर, तळेगाव दिघे, खराडी, वाघापूर, चिंचोली गुरव, रणखांबवाडी, दरेवाडी, जांबूत बुद्रुक, कर्जुले पठार, डोळासणे, पिंपरणे, कोल्हेवाडी, कोळवाडे, मालुंजे, अंभोरे, निंबाळे, जोर्वे, वडझरी बुद्रुक, निमोण, वडझरी खुर्द, हंगेवाडी, कनकापूर, करूले, निळवंडे, पोखरी हवेली, सादतपूर, रहिमपूर, उंबरी बाळापूर, निमगाव जाळी, ओझर खुर्द, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव भोजापूर, चिकणी, सायखिंडी या ३७ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. यापैकी सायखिंडी आणि डोळासणे या दोन ग्रामपंचायतींचे सरपंच, तसेच निंबाळे आणि कोळवाडे ग्रामपंचायतींचे सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का
संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत १३.७ टक्के, ९.३० ते ११.३० या वेळेत २१.७ टक्के, १९.३० ते ९.३० या वेळेत ५०.८ टक्के तर १.३० ते ३.३० या वेळेत ६७.५ टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा वाढायला सुरुवात झाली.
Web Title: Gram Panchayat Election Thorat in 14 villages against Vikhe group of Churas
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App