संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना उसाला देणार ‘इतक्या’ हजारांचा भाव!
Sangamner News: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन २८३५ रुपये भाव ( price for sugarcane) दिला जाणार असल्याची घोषणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने अत्यंत अडचणीतून चांगले काम करताना यावर्षी १० लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन २८३५ रुपये भाव दिला जाणार असल्याची घोषणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ हे होते.
याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, शंकर खेमनर, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, कारखान्याचे व्हा. चेअरमन संतोष हासे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढीबरोबर उत्पादकानी आधुनिक प्रणालीचा वापर करून कमीत कमी एकरी शंभर मेट्रीक टन उत्पादन होईल. यासाठी काम केले पाहिजे. कमी खर्च, कमी श्रम आणि जास्त उत्पादन हे सूत्र घेतले, तर उसाला जादा भाव देता येईल.
यावर्षी कारखान्याने दहा लाख मेट्रीक टनाचे गाळप केले असून याबरोबर सहा कोटी बावीस लाख युनिटची वीज निर्मिती, अल्कोहोल निर्मिती, रूफ टॉप वीज निर्मिती, विविध खतांची निर्मिती केली आहे.
सीएनजी पेट्रोल पंप सुरू केला असून आगामी काळात ग्रीन हायड्रोजन प्रकल्प येतो ही यशस्वी वाटचाल सुरू आहे. यावर्षी कार्यक्षेत्राबाहेरील २७१५ रुपये प्रति टनाने भाव तर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकाम करता २८३५ रुपये भाव दिला जाणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी आधुनिकतेने शेती करत कमी पाणी व श्रमात जास्त उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दररोजच्या बातम्या मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, देशात सर्वत्र खाजगीकरणाला वाव दिला आहे. मात्र सहकार हा सर्वसामान्यांसाठी आहे. तो टिकला पाहिजे आणि वाढवला पाहिजे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्त्वावर चालणारा संगमनेरचा सहकार आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशाला दिशादर्शक ठरला आहे.
यावेळी भारत वर्पे, तात्याबा बोराडे, सुभाष गुंजाळ, विलास वरपे यांचे विविध सभासदांनी आपली मते व्यक्त केली. या सभेचे नोटीसचे वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. प्रारंभी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.
Web Title: Thorat factory will give ‘so many’ thousand price for sugarcane
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App