संगमनेरमध्ये चोरीचा नवा फंडा, महिलेचे पावणे दोन तोळ्याचे सोने लंपास
Sangamner Theft: गणपतीला हार व प्रसाद द्यायचा सांगत हातचलाखी दाखवून महिलेचे पावणेदोन तोळ्यांचे सोने चोरून नेण्यात आल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर शहर आणि तालुक्यात चोरी, घरफोडी, दरोड्याच्या घटना ताज्या असतानाच आता गणपतीला हार व प्रसाद द्यायचा सांगत हातचलाखी दाखवून महिलेचे पावणेदोन तोळ्यांचे सोने चोरून नेण्यात आले आहेत. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार महिलेचे पानाचे दुकान असून, सोमवारी दुपारी त्यांच्या टपरीसमोर एकजण आला. त्याने तंबाखू विकत घेऊन गणपती मंदिर कोठे आहे, अशी विचारणा केली. तेथे जाऊन हार व प्रसाद मला मंदिरातील पुजाऱ्यांना दान करायचा असल्याचे त्याने सांगितले. फिर्यादी महिलेने वीजवितरण कंपनीच्या महिलेकडे दिली. कार्यालयाजवळ गणपती मंदिर आहे, असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या खिशातून शंभर रुपयांच्या पाच नोटा काढल्या. ‘मी सोने-चांदीचे दुकान टाकले आहे. मला मंदिरात पाचशे रुपयांचे दान करायचे आहे’, असे सांगितले. दान करायच्या या पैशांना सोने लावून दान करायचे असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे महिलेने गळ्यातील सोन्याची चैन त्याच्या हातात दिली. त्यावर त्याने त्याच्याकडील शंभर रुपयांच्या एका नोटेत माझी चैन गुंडाळली व चारशे रुपये फुलांच्या पिशवीत टाकून पिशवीला गाठ मारून ‘पिशवी तुमच्या दुकानातील देवापुढे अर्धातास ठेवा व नंतर मंदिरात देऊन ‘टाका’ असे तो म्हणाला.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
महिलेने पिशवी घेऊन दुकानातील फोटोपुढे ठेवली. त्यानंतर तो माणूस निघून गेला. काहीवेळाने महिलेने पिशवी उघडून पाहिली असता त्यात शंभर रुपयांच्या चार नोटा व झेंडूच्या फुलांची माळ व दोन बिस्किटचे पुडे दिसले. मात्र, सोन्याची चैन दिसली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच या महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
Web Title: theft, woman’s foot two tola gold lumpas
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App